ठळक बातम्या

आऊटफिटमुळे आता दिपिकाही झाली ट्रोल


बॉलीवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण सोशल मिडियावर पुन्हा एकदा अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाली आहे. इंटरनेट युजर्स दिपिका पदुकोणला तिच्या आऊटफिटवरुन ट्रोल करताना दिसत आहेत. खरेतर ही कोणतीही नवीन गोष्ट नाहीयं. कारण सोशल मिडियावर नेहमी सेलेब्स आपले ड्रेस आणि लुकमुळे ट्रोल होतच असतात. दिपिकाही आपल्या लुकसोबत मोजे आणि हाय हिल्स असलेल्या सॅँडल्स मुळे ट्रोल झाली आहे. दिपिकाला अखेरच्या वेळेस छपाक या चित्रपटात पाहण्यात आले होते. हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता.
खरेतर दिपिकाला तिच्या क्लासी आणि फॅशनेबल लुकसाठी ओळखले जाते. तर तिचा पती रणवीर सिंग हा त्याच्या अतरंगी फॅशनसाठी प्रख्यात आहे. रणवीरच्या फॅशन स्टेटमेंटबद्दल बोलताना अनेकदा युजर्सनी तो काहीही घालू शकतो असे म्हटले आहे. परंतु यावेळेस सोशल मिडिया युजर्सच्या ट्रोलिंगची शिकार ठरलीय ती म्हणजे दिपिका. दिपिकाचा एक एअरपोर्ट लुक व्हायरल होत आहे. ती चेहऱ्यावर मास्क लावून फोटो काढताना दिसून येतेय. तिने निळ्या रंगाची ओव्हरसाईज्ड डेनिम जॅकेट आणि हलक्या निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. ज्यावर तिचे उंच हिल्सचे सॅँडल्स जराही मॅच होत नाहीयेत. त्यामुळे सोशल मिडिया युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने दिपिकाच्या आऊटफिटबद्दल कमेंट केले आहे,’ रणवीरचे कपडे घातलेस का दीदी?’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,’ दिपिकाला का वाटते की हिल्ससोबत मोजे घालण्याची स्टाईल आहे?’ तर अन्य एकाने लिहिले आहे,’ दिपिकाच्या या स्टाईलला बिल्कुल कॉपी करु नकात कारण ती जराही चांगली नाहीयं.’

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …