ठळक बातम्या

आई आणि मुलगी दिसायला आहेत कार्बन कॉपी

सुंदर दिसणे ही निसर्गाची देणगी आहे आणि जर हे स्वरूप अनुवांशिकरित्या तुमच्याकडे हस्तांतरित झाले, तर अगदी सोन्याहून पिवळे असेच म्हणता येईल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि फिटनेस ट्रेनर ज्युलिया परफेटोने तिचे रहस्य उघड केले आहे की, तिला तिचे परिपूर्ण शरीर कोठून मिळाले? तिने टिकटॉकवर तिच्या आईसोबत काही सेकंदांचा व्हिडीओ टाकून लोकांना आश्चर्यचकित केले. व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिची आई होती; पण हे पाहून कोणाचाही विश्वास बसेना.
टिकटॉकवर एक व्हिडीओ पोस्ट करून, ज्युलिया परफेटोने तिच्या आईसोबत तिचे नाते शेअर केले आहे. तिची आई सुंदर असल्यामुळेच ती स्वत: इतकी सुंदर असल्याचेही तिने सांगितले आहे.

एवढेच नाही, तर २२ वर्षीय फिटनेस ट्रेनरने गंमतीच्या स्वरात असेही म्हटले आहे की, तिच्या आईला पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, पुढील काही वर्षांमध्ये ती किती सुंदर आणि परिपूर्ण दिसणार आहे. खरं तर, आई आणि मुलगी ओळखणे कठीण आहे, कारण दोघीही अगदी एकमेकींच्या कार्बन कॉपी आहेत.
ज्याने त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहिले, त्यांनी ज्युलिया तिच्या आईसोबत आहे, यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. या दोघी नक्कीच बहिणी असल्याचं बहुतेकांनी म्हटलं आहे.

ज्युलियाने @्न४’्रं.स्री१ाी३३ङ्म नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरून हा व्हिडीओ टाकला आहे, जो आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ज्युलिया केवळ सुंदरच नाही, तर तिच्या आईचे दिसणे आणि तिची फिगर पाहणाºयांना आश्चर्यचकित करत आहे.
ही पोस्ट पाहिल्यानंतर, युझर्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी लगेच ज्युलिया आणि तिच्या आईला त्यांच्या स्किनकेअर रूटीनबद्दल विचारण्यास सुरुवात केली. एका युझरने लिहिले की, ती तुझी बहीण आहे, असे म्हण. तर, आणखी एका युझरने ती वयाबरोबर अधिक सुंदर होत असल्याचे म्हटले.

ज्युलिया स्वत: एक खासगी ट्रेनर आहे, जी लोकांना फिट राहण्यासाठी टिप्स देते. तिचं इन्स्टाग्रामवरही एक अकाऊंट आहे, ज्याला ३८१९ लोक फॉलो करतात. ती तिच्या फॉलोअर्ससाठी उपकरणांशिवाय स्किनकेअर आणि फिटनेसवर व्हिडीओ पोस्ट करत असते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …