ठळक बातम्या

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री रोसैया यांचे निधन

हैदराबाद – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री के. रोसैया यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. हैदराबाद स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ८८ वर्षीय रोसैया हे काँग्रेस पक्षातील प्रमुख व्यक्ती होते. तामिळनाडूचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. रोसैया यांचा अर्थमंत्री म्हणून दीर्घकाळ कार्यकाळ होता आणि त्यांनी १६ अर्थसंकल्प सादर केले. रोसैया हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. ते काँग्रेसचे आमदार आणि खासदारही राहिले आहेत. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. रोसैया यांचा जन्म ४ जुलै १९३३ रोजी गुंटूर जिल्ह्यातील वेमूर येथे झाला होता, तर गुंटूर हिंदू कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले होते. राजकारणात आल्यानंतर काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. रोसैया यांना राज्य मंत्रिमंडळाचा प्रदीर्घ अनुभव होता. ३ सप्टेंबर २००९ ते २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले, तर रोसैया यांनी ३१ ऑगस्ट २०११ ते ३० ऑगस्ट २०१६ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …