ठळक बातम्या

आंध्र प्रदेशची जान्हवी दांगेती घेणार अवकाश भरारी!

‘नासा’चा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय

अमरावती – आंध्र प्रदेशच्या जान्हवी दांगेती या मुलीने भारताचा मान जागतिक स्तरावर उंचावला आहे. जान्हवीने देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. जान्हवी दांगेतीने नुकताच अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थे (नासा)चा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम (आयएएसपी) अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बनली आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शून्य गुरुत्वाकर्षण, पाण्याखालील रॉकेट प्रक्षेपण, विमान हाताळणी, बहु-प्रवेश प्रशिक्षण आणि अंतराळसंबंधी अन्य तंत्रज्ञानाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. या अभ्यासक्रमासाठी जगभरातील केवळ २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. जगभरातील १६ जणांचा समावेश असलेल्या ‘टीम केनेडी’साठी ‘मिशन डायरेक्टर’ म्हणूनही जान्हवीची नियुक्ती करण्यात आली, जिथे तिने अनेक देशांमधील लोकांच्या गटांचे नेतृत्व केले, तसेच तिने सूक्ष्म रॉकेट प्रक्षेपणही यशस्वीपणे केले. जान्हवी आंध्र प्रदेशमधील पलाकोल्लू येथील अभियांत्रिकी शाखेत द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती अवघ्या १९ वर्षांची आहे. या यशाबाबत प्रतिक्रिया देताना जान्हवीने सांगितले की, मंगळ ग्रहावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीयांपैकी एक होण्याचे तिचे स्वप्न आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …