मुंबई- एसटी कामगारांचा संप सुटत नसल्याने एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली तरी आंदोलन सुरूच राहील. एकही कामगार घरी जाणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. एसटीचे करणार अशी अफवा सरकार पसरवत आहे. त्यामुळे आमचा संप संपेल आणि सर्व एसटी कर्मचारी आपापल्या घरी जातील असं सरकारला वाटत आहे. पण हा सरकारचा भ्रम आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत असे काहीही होणार नाही. आम्ही आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असं खोत यांनी स्पष्ट केलं.
पवार साहेब जे म्हणत आहे की मध्य मार्ग काढू, तर आम्ही तरी कुठे म्हणतोय की आडवळणानं जाऊ. मध्यम मार्ग काय आहे तो पवारसाहेब तुम्ही सांगा. ते अभ्यासू व्यक्ती आहेत. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. पण नेमचा त्यांचा मध्य पूर्वेला आहे, दक्षिणेला आहे की उत्तरेला आहे हे मात्र कधीच कुणाला समजून आलं नाही. मला वाटतं की राजकारण राजकारणाच्या जागी राहू द्या. पण ज्या कामगारांनी तुम्हाला मोठं केलं असं त्यांच्या अधिवेशनात सांगता मग त्या कामगारांचे अश्रू पवारसाहेबांना का दिसले नाहीत? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …