तिघींचा मृत्यू
चंदीगड – हरियाणातील बहादूरगडमध्ये गुरुवारी (२८ आॅक्टोबर) एका भरधाव ट्रकने ६ आंदोलक महिला शेतकºयांना चिरडले. यात तिघींचा मृत्यू झालाय, तर तीन महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. या महिला झज्जर रोडवरील दुभाजकावर (डिव्हायडर) बसलेल्या होत्या. यावेळी भरधाव ट्रक अचानक थेट दुभाजकावर चढला आणि महिलांना चिरडले. या घटनेवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ही कू्ररता आणि द्वेष आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहे, असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले.
पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून चौकशी सुरू केली. २८ आॅक्टोबरला सकाळी साडेसहा वाजता महिला रस्त्यावरील दुभाजकावर बसलेल्या असताना ट्रकने त्यांना चिरडले. यात २ महिलांचा जागेवरच मृत्यू झाला, तर इतर ४ महिला गंभीर जखमी होत्या. यातील एका महिलेने रुग्णालयात उपचारादरम्यानच अखेरचा श्वास घेतला. मृत सर्व महिला पंजाबमधील मानसा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. या महिला गुरुवारी सकाळी आपल्या घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत दुभाजकावर बसल्या होत्या. त्याचवेळी झज्जर रोडवर उड्डाणपुलाखाली एका ट्रकने त्यांना चिरडले.
राहुल गांधी म्हणाले, भारत माता, देशाच्या अन्नदात्याला ट्रकखाली चिरडलेय. ही क्रूरता आणि द्वेष आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहे. पीडितांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना. केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या महिलादेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. याआधी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या महिंद्रा थार जीपखाली चिरडून ४ शेतकºयांचा आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत गाडीतील तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …