आंतरराष्ट्रीय एम्मी नॉमिनेटेड ‘आर्या’ घेऊन येत आहे नवा सीझन!

आर्या परत आली आहे आणि यावेळी फास आणखी घट्ट कसला जाणार आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिजनी पल्स हॉटस्टार, आंतरराष्ट्रीय एम्मी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त हंगाम घेऊन येत आहे. या शोचे चाहते बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टिझरसाठी खूप उत्सुक आहेत. याचा टिझर एक प्रभावी आणि वेधक कथानक सादर करतो. ज्यात आर्या तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेते. राम माधवानी फिल्म्सकडून पुरस्कार विजेत्या आणि अत्यंत प्रतिभावान राम माधवानी निर्मित, हा टिझर प्रेक्षकांना एक रोमांचक आणि रक्तरंजित शो सादर करणार आहे. ज्यामध्ये आर्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये आर्या सरीनचा प्रवास अधिक कठोर आणि गडद होणार आहे. या टिझरमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एक भयंकर आणि क्रूर लूकमध्ये दिसत आहे, ती उग्र लाल रंगात माखलेली असून, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठोरपणे लढणाऱ्या वाघीणीसारखी दिसत आहे.

दुसऱ्या सीझनविषयी, दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले की, पहिल्या सीझनसाठी आम्हाला मिळालेले प्रचंड कौतुक आणि प्रेम खूप सुखावणारे होते, यासाठी आम्ही प्रेमपूर्वक आणि संपूर्ण मेहनतीने याचा दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल एम्मी ॲवार्ड्समध्ये बेस्ट ड्रामा श्रेणीमध्ये झालेले या शोचे नॉमिनेशन या कथेवरचा आमचा विश्वास प्रदर्शित करतो, जी ऐकवण्यासाठी आम्ही इथे आहोत. शोच्या चाहत्यांना आर्याच्या प्रवासातील पुढचे पाऊल सादर करण्यासाठी मी उत्साहित आहे. ती प्रत्येक पाऊलावर आव्हानांना सामोरे जाते कारण ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवणे आणि बदला घेण्यासाठी, संतुलन बनवण्यासाठी मजबूर आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …