मेलबर्न – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. या कसोटीचा पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव १८५ धावांत गुंडाळला. पहिल्याच दिवशी अडचणीत सापडलेल्या इंग्लंड संघावर दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वीच अजून एक मोठे संकट कोसळले आहे. इंग्लंड संघातील ४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
इंग्लंडच्या संघातील सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य आणि दोन खेळाडूंच्या कुटुंबातील दोन असे एकूण ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या तरी या ४ जणांच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत फक्त इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, तर मालिका प्रसारित करणाऱ्या चॅनल स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला देखील विलगीकरणात राहावे लागले होते. तो दुसऱ्या कसोटीला मुकला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे कळल्यानंतर लगेचच त्याची कोरोना चाचणी केली होती. पॅट कमिन्सची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, तरीसुद्धा कमिन्सला विलगीकरणात राहावे लागले होते. आता तो पूर्णपणे फिट आहे आणि तिसऱ्या कसोटीत तो कांगारूंचे नेतृत्व करत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …