अ­ॅशेस मालिकेमध्ये कोरोनाची एंट्री

मेलबर्न – अ­ॅडलेडमधील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अ­ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचे प्रसारण करणाऱ्या ब्रॉडकास्ट क्रूमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोविड-१९ चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सामना स्थळाच्या आयोजकांकडून पत्रक जारी करून रविवारी ही माहिती देण्यात आली. संबंधित परिसर सॅनिटाइझ करण्यात आला असल्याचे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले. कसोटी सामन्यादरम्यान कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलियाकडून विशेष काळजी घेण्यात येत असून नियमित तपासणी केली जात आहे. अशाच तपासणीमध्ये ब्रॉडकास्ट टीममधील सदस्याला कोविडची लागण झाल्याचे आढळून आले. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, कोविडची लागण झालेली व्यक्ती ब्रिटिश मीडियाचा सदस्य आहे.
यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला आयसोलेट व्हावे लागले. त्यामुळे मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्याला खेळता आला नाही. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे सिडनी, मेलबर्न या ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरांमध्ये कोविडची रुग्ण संख्या वाढत आहे. अ­ॅशेस मालिकेतील पुढचे दोन सामने या शहरांमध्ये होणार आहेत. खेळाडूंनाही अतिरिक्त खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. उर्वरित मालिकेमध्ये टीमला कोरोनाचा कोणताही फटका बसू नये म्हणून ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने खेळाडूंवर कडक निर्बंध घातले आहेत.
एका खेळाडूने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तीन जणांच्या ग्रुपमध्येच सराव करण्याची परवानगी आहे. याचा अर्थ सर्व बॉलर्सना एकत्र सराव करता येणार नाही. त्याचबरोबर खेळाडूंना रेस्टॉरंटमध्ये खाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. बातमीनुसार ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही टीमच्या खेळाडूंना नियमांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता खेळाडू बारमध्ये जाऊ शकणार नाहीत. त्यांना केस कापण्यास तसेच जिमचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. खेळाडूंना मैदानाबाहेर फक्त कुटुंबीय किंवा मित्रांना भेटण्याची परवानगी आहे. पण, त्यानंतर पुन्हा टीममध्ये परतण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी केली जाईल. अ­ॅशेस मालिकेमधील तिसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तर चौथी कसोटी ५ जानेवारीपासून सिडनीमध्ये होणार आहे. या दोन कसोट्यांदरम्यान हे निर्बंध लागू असतील. पाचवी आणि शेवटची कसोटी १४ जानेवारी रोजी होबार्टमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेमधील पहिली कसोटी ब्रिस्बेनमध्ये झाली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …