अ­ॅशेस मालिका : इंग्लंडची टिच्चून गोलंदाजी; वॉर्नरच्या बॅटला लगाम

पॅट कमिन्स विलगीकरणात
मेलबर्न – ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दरम्यान अ­ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. अ­ॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखेच महत्त्व आहे. अ­ॅशेसची स्वत:ची एक परंपरा आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ जिवाचे रान करतात. मालिकेतील पहिली कसोटी ९ विकेट्सनी जिंकून ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही तीच लय कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.
अ­ॅडलेडच्या ओव्हल मैदानावर दुसरा कसोटी सामना होत आहे. हा डे-नाईट कसोटी सामना आहे. दुसरी कसोटी सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाला एक झटका बसला. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला विलगीकरणामध्ये जावे लागले आहे. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करीत आहे. ट्रेव्हिस हेडला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मिचेल नासेरचाही ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
३ वर्षांनंतर स्मिथला पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या डे-नाइट कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला असून इंग्लिश गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली, पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांना फक्त मार्कस हॅरिसला बाद करता आले. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर हॅरिस अवघ्या तीन धावांवर बाद झाला. लाबुशेन आणि डेव्हिड वॉर्नरला इंग्लिश गोलंदाजांनी चांगलेच सतावले. पण दोघांनी खेळपट्टीवर टिकून राहत इंग्लंडला दुसरी विकेट मिळणार नाही, याची काळजी घेतली. पहिल्या सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून ४५ धावा केल्या आहेत. वॉर्नर २० आणि लाबुशेन १६ धावांवर खेळत आहेत. वॉर्नरला २० धावा करण्यासाठी तब्बल ७२ चेंडू खेळावे लागले.
पॅट कमिन्स बुधवारी रात्री हॉटेलमध्ये कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेला आहे. कमिन्सला त्याच्या टेबलवरील व्यक्ती कोरोनाने संक्रमित असल्याचे समजतात त्याने तातडीने ते हॉटेल सोडले आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या विषयाची कल्पना दिली. त्यानंतर कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असेल, असे जाहीर करण्यात आले. तर मिचेल नासेरचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. नासेरची ही पहिलीच कसोटी आहे. कमिन्सची नंतर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आहे. तरीही त्याला खबरदारीचा उपाय म्हणून सात दिवस विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे. कमिन्सने बायो-बबलचे उल्लंघन केलेले नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …