अहमदाबादच्या टीमबाबत बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम दाखल होणार आहेत. बीसीसीआयने लिलावाच्या माध्यमातून या दोन शहरांच्या टीमचे मालकी हक्क विकले आहेत. यापैकी अहमदाबाद फ्रँचायझीची मालकी सीव्हीसी कॅपिटलने मिळवली आहे. सीव्हीसी ग्रुपचा संबंध ऑनलाईन सट्टाबाजार आणि जुगाराशी आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
अहमदाबादच्या टीमला बीसीसीआय लवकरच लेटर ऑफ इंटेट देणार आहे, असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. बीसीसीआयच्या तीन सदस्यी लीगल समितीने या विषयावर या ग्रुपला क्लीन चीट दिली असून, त्यामुळे या टीमचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वृत्तानुसार, बीसीसीआयच्या महासभेत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सीव्हीसी कंपनीच्या संदर्भातील मालकी हक्काची माहिती देण्यात आली. त्यानुसार सीव्हीसीकडे युरोपीयन आणि आशियाई असे दोन फंड आहेत. युरोपियन फंडचे कनेक्शन बेटींग कंपनीशी आहे, कारण युरोपमध्ये बेटींग कायदेशीर आहे. तर अहमदाबाद टीममध्ये कंपनीने आशियाई फंडातून गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा बेटींगशी संबंध नाही. सीव्हीसी कॅपिटलला क्लीन चीट देण्यासाठी बीसीसीआयला वेळ लागला आहे. यापूर्वी या दोन्ही टीम्सना लिलावापूर्वी ड्राफ्टच्या माध्यमातून खेळाडू निवडण्यासाठी २५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत जानेवारीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …