अहमदनगर – पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात आणखी ३३ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने विद्यालयातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५२ वर पोहचली आहे. गुरुवारी व शुक्रवारी विद्यालयात एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयातील शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हे विद्यालय निवासी स्वरूपाचे असल्याने विद्यालयातील उर्वरित ४१० विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी ३३ जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहचली असून, आणखी ५० ते ६० जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. या ५२ कोरोनाबाधितांमध्ये ३० विद्यार्थिंनी, २० विद्यार्थी व दोन शिक्षकांचा समावेश आहे. सर्व कोरोनाबाधितांवर पारनेर येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांनी सांगितले, तसेच सर्वांना विलगीकरणात ठेवले आहे. या सर्वांची प्रकृती चांगली असून, त्यांना कोणताही त्रास होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये, ज्या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांना वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात रविवारी दुपारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवोदय विद्यालयास प्रत्यक्ष भेट दिली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …