ठळक बातम्या

अश्विन कुमारच्या घरी पोलिसांची धाड : तब्बल २५ किलो चांदी अन् २ किलो सोने जप्त

पुणे – टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठे घबाड जप्त केले आहे. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरातून तब्बल २५ किलो चांदी, दोन किलो सोने आणि काही हिरे जप्त केले आहेत. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी. ए. सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली होती.
अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना मोठे घबाड आढळून आले आहे. अश्विन कुमार याच्या घरातून २५ किलो चांदी आणि २ किलो सोन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या टीमने अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरी झाडाझडती केली असता हे घबाड सापडले आहे. पेपरफुटी प्रकरणात अश्विन कुमार हा प्रीतिश देशमुखबरोबर काम करत होता.
आरोग्य भरतीनंतर म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघाले आहे. टीईटी पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. छापेमारीत आरोपी सुपे यांच्या घरात पोलिसांना दोन कोटींहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसºया ठिकाणी लपवली होती.
तुकाराम सुपे यांच्या घरी जप्त करण्यात आलेल्या या रकमेनंतर इतरही ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. सुपे यांनी इतरांकडे पैसे ठेवण्यास दिले होते आणि आता ते सुद्धा जप्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची रक्कम, दागदागिने जप्त करण्यात आले आहेत.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …