ठळक बातम्या

अश्विनने टाकले हरभजनला पिछाडीवर… मिळवले ‘हे’ यश

कानपूर – भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन सोमवारी येथे हरभजन सिंगला पिछाडीवर टाकत भारतासाठी सर्वाधिक कसोटी क्रिकेट विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनला. अश्विनने आपल्या ८०व्या कसोटीत ही कमाल केली.
या यादीत महान लेग स्पिनर अनिल कुंबळे अव्वल स्थानी असून, त्यांच्या नावे ६१९ कसोटी विकेट आहेत. भारताचे पहिले विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांच्या नावे ४३४ कसोटी विकेटची नोंद आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी टॉम लॅथमला बाद करत ४१८वा कसोटी विकेट मिळवला. हरभजनने १०३ कसोटीत ४१७ विकेट मिळवलेत. अश्विनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात तीन विकेट मिळवले. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना हरभजन म्हणाला, मी अश्विनचे अभिनंदन करतो. अपेक्षा आहे की, तो भारतासाठी आणखीन सामने जिंकेल. मला तुलना आवडत नाही. आम्ही वेगवेगळ्या दौऱ्यात वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळलो आहोत. मी आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली व आता तिच कामगिरी अश्विन करत आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत १३व्या स्थानी पोहचला. त्याने पाकिस्तानचा वसीम अकरम (४१४)ला पिछाडीवर टाकले. सध्याच्या कसोटी क्रिकेटपटूंमध्ये अश्विनपेक्षा जास्त विकेट इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (५२४) व जेम्स अँडरसन (६३२) यांच्या नावे आहेत. अश्विनने दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध २०११ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी करताना २६८५ धावा केल्या, ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. त्याने १११ वनडेमध्ये १५० व ५१ टी-२०मध्ये ६१ विकेट घेतल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …