अलायाने बोल्ड ब्रालेटमध्ये दिल्या हॉट पोझेस

पूजा बेदीची कन्या अलाया फर्निचरवाला ही आपल्या बोल्डनेससाठी चांगलीच फेमस आहे. सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह राहणारी अलाया आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते जे वेगाने व्हायरलही होतात. अलायाच्या हॉट, बोल्ड आणि स्टायलिश फोटोंमुळे तिची अभिनय कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच तिचा चाहता वर्ग तयार झाला आहे. लवकरच अलाया कार्तिक आर्यनसोबत फ्रेडी या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, शूटिंगमधून उसंत मिळताच अलायाने आपला मोर्चा मालदीवच्या दिशेने वळवला होता.
अलायाने मालदीव येथून काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तिने सफेद रंगाचे फ्लोरल आऊटफिट घातलेले दिसून येत आहे. व्हाइट फ्लॉवर रंगाच्या ब्रालेटमध्ये अलायाचे रूप चांगलेच खुलून दिसत आहे. याशिवाय अलाया बीचवर मजामस्ती करतानाही पाहायला मिळत आहे. अलायाने बिकनीतील काही फोटोही शेअर केले असून, त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. जवानी जानेमन या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या अलायाने एकता कपूरच्या प्रोडक्शनअंतर्गत तयार होत असलेला दुसरा चित्रपटही साइन केल्याची चर्चा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …