ठळक बातम्या

अर्जुन रामपालने सुरू केले थ्री मंकीजचे शूटिंग

संपूर्ण जगभरातील सर्वात प्रख्यात सीरिजपैकी एक असलेल्या मनी हाइस्टचे भारतातही हजारो फॅन्स आहेत. आता या अत्यंत लोकप्रिय सीरिजचे हिंदी ॲडप्टेशन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार होणार आहे. या सीरिजचे टायटल थ्री मंकीज असेल व त्याचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान करणार आहे. या सीरिजचे शूटिंग नुकतेच सुरू झाले असून, अर्जुन रामपाल यात मुख्य भूमिका साकारणार आहे. या सीरिजमधील आपला दाढीवाला लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये अर्जुन रामपालने म्हटले आहे, ‘लाइट्स , कॅमेरा, ॲक्शन. पुन्हा एकदा सेटवर. एक नवा प्रवास सुरू.’

अर्जुन रामपाल हा गेल्या वेळेस नेल पॉलिशमध्ये दिसून आला होता, ज्यात त्याच्या सोबत मानव कौल मुख्य भूमिकेत दिसून आला होता. अर्जुन आता लवकरच धाकड या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. त्यात तो व्हिलन रुद्रवीरच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …