अर्जुन-मलाईकाचे पुलमध्ये रोमॅँटीक वर्कआऊट


अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा यांची जोडी बऱ्याच काळापासून एकत्र पाहण्यात न आल्याने या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या वावड्या नुकत्याच उठल्या होत्या. परंतु या दोघांनी मालदीवसारखे रोमॅँटीक ठिकाण ठाकून सध्या सुरु असलेल्या नको त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हे दोघेही मालदीवमध्ये एकत्र वेळ घालवित आहेत. दोघांनीही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. परंतु त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अर्जुन आणि मलाईका पूलमध्ये सायकलिंग करताना दिसून येत आहेत. असे म्हटले जाते की पाण्यात केले जाणारे वर्कआऊट हे खूप अवघड असते. परंतु असे असतानाही दोघे खूप जबरदस्त सायकलिंग करताना दिसून येत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून लोकांना त्यांचे कौतुक केल्यावाचून रहावले नाही.
नुकतेच हे दोघे मालदिवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांनी खूप सारे फोटो शेअर केले. या फोटोंचे वैशीष्ट्य एक होते की दोघांनीही आपले सोलो फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. परंतु समझने वालो को इशारा काफी होता है बॉस! हे दोघे एकत्र असल्याचे सुज्ञ युजर्सच्या लक्षात यायला फार काही वेळ लागला नाही.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …