अर्जुन मढवी स्मृती क्रिकेट स्पर्धा – राधिका, बतुलची चमकदार कामगिरी

ठाणे – कर्णधार राधिका ठक्करचे झंझावाती अर्धशतकी खेळी आणि बतुल परेराच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दहिसर स्पोर्ट्स क्लबने स्पोर्टिंग युनियन संघाचा ९४ धावांनी पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

राधिकाने तेरा चौकरांसह नाबाद ७८ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचे योगदान दिले. सौम्या सिंगने ३१ धावा केल्या. दहिसर स्पोर्ट्स क्लबने २० षटकांत ४ बाद १४५ धावा केल्या. या डावात प्रियांका साळगावकरने २५ धावा देत २ विकेट्स मिळवल्या. खुशी सावंत आणि जुईली भेकरेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. त्यानंतर बतुल परेराच्या भेदक माऱ्यासमोर स्पोर्टिंग युनियनचा डाव विसाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर अवघ्या ५१ धावांवर आटोपला. त्यांच्या खुशी सावंतचा (१०) अपवाद वगळता एकाही फलंदाजांला दुहेरी धावांच्या जवळ जाता आले नाही. बतुलने एकहाती अर्धा संघ तंबूत परत पाठवताना ३.४ षटकांत केवळ ६ धावा देत ५ फलंदाज बाद केले. राधिका ठक्करला तडाखेबंद फलंदाजीकरता सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवले. अन्य लढतीत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने स्पर्धेतला आपला सलग दुसरा विजय नोंदवताना कामत मेमोरियल क्रिकेट क्लबचा ९ विकेट्सनी धुव्वा उडवला. मिताली म्हात्रेच्या १८ धावांमुळे कामत मेमोरियल संघाला २० षटकांत ८ बाद ६८ धावा करता आल्या. सानिका चाळकेने १० धावांमध्ये २ विकेट्स मिळवल्या. रेश्मा नायक, मनाली दक्षिणी, फातिमा जाफर आणि समृद्धी राऊळने प्रत्येकी एक विकेट मिळवली. विजयाचे हे छोटे लक्ष्य दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने १ बाद ७२ अशा धावसंख्येसह १२ व्या षटकात पूर्ण केले. सानिका चाळकेने अष्टपैलू चमक दाखवताना सहा चौकार, एक षटकार ठोकत नाबाद ४१ धावांची खेळी केली. मंजिरी गावडेने २४ धावा केल्या. या डावातील एकमेव विकेट कशिश निर्मलने मिळवली. सानिकाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …