अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

माणूस जन्माला येतो, तेव्हा तो असंस्कृत असतो; पण संस्कार या माध्यमातून तो सुसंस्कृत होतो. त्याच्या सप्तगुणांचा, शक्तीचा विकास होतो. ज्याने त्याच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो. ज्याने तो एक सामाजिक, अध्यात्मिक मनाव होतो.
समाज तेव्हाच महान होतो, जेव्हा दया, करुणा, अर्जव, मार्दव, सरळता, शील, प्रतिभा, न्याय, ज्ञान, परोपकार, सहिष्णूता, प्रेम, सहकार्य, राष्ट्रप्रेम हे घटक श्रद्धास्थानी येतात. आपल्याकडे गर्भधारणा ते मृत्यूपर्यंत संस्कार चालूच असतात. संस्काराने व्यक्ती पूजनीय होते. त्यासाठी पूर्वीचे वसिष्ठ ऋषीं = राम-लक्ष्मण; परशुराम = भीष्म, द्रोणाचार्य; संदिपनी ऋषी = श्री कृष्ण असे महान ऋषी आणि त्यांनी घडवलेले महान शिष्य. ही परंपरा कुठे आणि आताच्या संस्कारांचे दृश्य.
पूर्वी मुलांवार चांगले संस्कार होण्यासाठी आई-वडील धडपडत असत; पण आता रेव्ह पार्ट्या, क्लब, हॉटेलिंग, मुलींबरोबर बेताल मजा करणे हेच सर्वस्व झालं आहे. तारेतारकांच्या मुलांना तर तेच स्वत: हे सर्व करा सांगतायत आणि मुलेही अंमलात आणताना दिसतायत. बरोबर उलट संस्कार. त्यांच्या पालकांचे पण मुले पूर्ण हाताबाहेर जाईपर्यंत दुर्लक्ष होतं. मुलांच्या हातात भरपूर पैसा आणि पालक तो कामावायच्या मागे, मग काय होणार.
२१ वर्षांच्या मुलांकडे खरंतर आदर्श पुस्तके, आदर्श शिक्षक, गुणी मित्र-मैत्रिणी स्वत:ला घडवण्यासाठी प्लॅनिंग याचे भांडार पाहिजे. जे आपलं आयुष्य बदलून टाकतं, तर या मुलांकडे कोकिन, ड्रग्ज, चरस, गांजा, बहकलेल्या मुली यांचा साठा. अहो याच वयाचा टोकियो आॅलिम्पिकमध्ये गोल्ड मॅडल मिळवलेला नीरज चोप्रा कुठे ज्याने त्याच कुटुंब, देश सगळ्यांची मान उंचावली. मान्य आहे सेलिब्रेटिंच्या मुलांची लाइफ स्टाइल वेगळी असते. ऐशोआराम, मजा हेच ध्येय असते; पण यातसुद्धा वेगळ्या मार्गाने जाऊन सुखी झालेली उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर आहेत. ती म्हणजे मयुरी कांगो, रिद्धीमा कपूर. माणूस म्हटलं की, चुका होणार आणि सुधारण्यासाठी सुधारगृहेही आहेत; पण जर कोणी समीर वानखेडेंसारखा मोठा अधिकारी जर त्यांना प्रामाणिकपणे सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना सहकार्य करायचं तर नवाब मलिकांसारखे नेते त्यांच्यावरच वाटेल ते आरोप करतायत. तुझी नोकरी जाईल, तुला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशी बेजबाबदार वक्तव्यं सरकारमधील या नेत्याला शोभत नाहीत. उलट तुम्ही सहकार्य करून तरुण पिढी बिघडवण्यापासून वाचवायला हवी. हा जर पालघर साधूंसाठी तुम्ही लावून धरलं असतं, तर आम्ही तुमचं कौतुकच केलं असतं; पण निरपराध लोकांची तुम्हाला जरा पर्वा नाही आणि अपराधी लोकांसाठी तुम्ही भांडताय. अरे कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र?
१८व्या वर्षी मतदानाला परमिशन मिळते, म्हणजे २३व्या वर्षी चांगलं, वाईट समजण्या इतके तुम्ही सुज्ञ असता. अहो या वयाची तरुण मुलं आज आपल्या आर्मीत असून, ते देशाचे रक्षण करण्यात अभिमान मानतायत. मग असं वाटतं पैशांच्या गुर्मीत तुम्ही वाहवत चालले आहात, राज्य सरकारची हीच स्थिती आहे. चुकीची साथ द्यायची आणि मग गोलमाल करून प्रकरणे बंद करायची. खूप लज्जास्पद आहे हे. तुम्हाला तुमच्या देशाच्या तरुणाईची प्रगती करायचीय की, अधोगती? मग ही पिढीही पुढे असेच नेते निवडून देणार जे कोणतंही कांड केलं, तरी त्यांना पाठिशी घालतील. मग देश घडणार कसा?
– वैशाली वसंत देसाई\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …