ठळक बातम्या

अरब देशांना खाद्यपदार्थांच्या निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. निर्यातीच्या बाबतीत भारताने एक मैलाचा दगड गाठला आहे. २०२०मध्ये अरब देशांना खाद्यपदार्थांच्या निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून, भारत हा अरब देशांचा सर्वात मोठा अन्न पुरवठादार बनला आहे.
गेल्या १५ वर्षांत प्रथमच असे घडले आहे, जेव्हा भारत याबाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे. अरब-ब्राझिलियन चेंबर आॅफ कॉमर्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड महामारीमुळे २०२० मध्ये अरब ब्राझीलच्या व्यापारात घट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. अरब देश हे ब्राझीलसाठी सर्वात महत्त्वाचे व्यापारी भागीदार आहेत. कोरोना महामारीपूर्वी ब्राझील अरब देशांना अन्न निर्यात करण्यात आघाडीवर होता. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली, तर २०२० मध्ये २२ अब्ज देशांच्या एकूण कृषी व्यवसाय उत्पादनांच्या निर्यातीत ब्राझीलचा वाटा फक्त ८.१५ टक्के होता, तर भारताचा वाटा ८.२५ टक्के झाला आहे.
आधी ब्राझीलची जहाजे एका महिन्यात सौदी अरेबियात पोहोचायची, आता तिथे पोहोचायला दोन महिने लागतात, तर भारत अगदी जवळ असल्याने तिथे फळे, भाजीपाला, फळभाज्या अवघ्या आठवडाभरात पोहोचतात. साखर, धान्ये, मांस वितरीत करतात. ब्राझीलच्या खाद्यपदार्थांची अरब देशांमध्ये पोहोच कमी झाल्यावर सौदी अरेबियाने देशातच उत्पादनाचा आग्रह धरला. यासोबतच भारतातून होणाºया आयातीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …