ठळक बातम्या

अय्यरच्या शतकासह जडेजा-गिलची अर्धशतके

भारताने रचला ३४५ धावांचा डोंगर
कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने उत्तम आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर ३४५ धावांचा डोंगर उभारला आहे. यामध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या शतकासह शुभमन गिल आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. दुसऱ्या दिवशीच्या सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करून दिली. मयांक अगरवाल (१३) आणि चेतेश्वर पुजारा (२६) यांनी त्याला काहीशी साथ दिली. शुभमनने अर्धशतक (५२) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेही ३५ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने अनुभवी रवींद्र जडेजासह भारताचा डाव सावरत शतकी भागिदारी रचली. तत्पूर्वी, गुरुवारी पहिल्या दिवसअखेरीस श्रेयस अय्यर नाबाद ७५ आणि रवींद्र जडेजा नाबाद ५० धावांवर खेळत होते.
दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच रवींद्र जडेजा बाद झाला. पण श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण केले. १३ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०५ धावा करून अय्यरही बाद झाला. दुसऱ्या दिवशी टीम साऊथीच्या भेदक गोलंदाजीमुळे एक-एक भारतीय तंबूत परतत होते. पण त्याचवेळी अनुभवी रवीचंद्रन अश्विनने ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला उमेश यादवने ३४ चेंडूत १० धावांची संयमी साथ देत भारताला ३४५ धावांपर्यंत पोहोचवले. पण अश्विन बाद होताच इशांत शर्माही लगेचच तंबूत परतला आणि भारताचा पहिला डाव ३४५ धावांवर आटोपला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …