अमेरिकन सिंगर क्रिस्टीना एगुडलेराने जन्मदिनी केले बोल्ड फोटोशूट

अमेरिकेची प्रख्यात सिंगर क्रिस्टीना एगुडलेराने नुकताच आपला ४१वा जन्मदिन साजरा केला आणि तोही एका खास अंदाजात! क्रिस्टीनाने आपले टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपला जन्मदिन हटके बनवण्याचा प्रयत्न केला.
क्रिस्टीना एगुडलेराने अनेक शानदार गाणी गाऊन लोकप्रियता मिळवली आहे. ती आपल्या बोल्ड अंदाजामुळेही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह राहणारी क्रिस्टीना आपल्या चाहत्यांना आनंद मिळावा, म्हणून तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आपल्या ४१व्या जन्मदिनीही क्रिस्टीनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले अनेक टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. क्रिस्टीना प्लॅटीनम ब्लाँड केसांमध्ये टॉपलेस दिसून येतेयं. तर काही फोटोंमध्ये ती हातात ब्लॅक लेदर आर्म वॉर्मर आणि प्राडा ग्लव्हज घातलेली दिसून येतेयं. त्याचबरोबर डोळ्यांवर काळा गॉगलही पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना क्रिस्टीनाने दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने रोमन न्यूमरलमध्ये निक नेम आणि वय लिहिले आहे. क्रिस्टीनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …