मुंबई – मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने शनिवारी मनसेकडून राज्यातील एकूण ४० समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली गेली. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती केली होती. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अमित ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारकडून अपेक्षा ठेवता येणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाच्या बाबतीत कसे काम होणार?, किनारे बघितले तर लक्षात येईल. आपला समुद्रकिनारा आहे. आपणच साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. सरकारकडे जबाबदारी देऊन आपण बघितलेय काय होते ते. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यांच्या अस्वच्छतेबाबत विचारणा केली असता अमित ठाकरे म्हणाले, यासाठी इच्छाशक्ती लागते. गेली २५ वर्ष त्यांच्याकडे महानगर पालिकेची सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांच्याकडे दुर्दैवाने इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीत. त्यांनी यंत्रणा व्यवस्थित राबवली असती, तर दुसऱ्या कुणालाही बीच साफसफाईची गरज लागली नसती. आरे लोकांमुळे वाचले, लोक रस्त्यावर उतरली, त्यांनी विरोध केला त्यामुळे आरेचे जंगल वाचले, असे ते म्हणाले. यावर अमित ठाकरे राजकारण थोडेसे लहान आहेत. ते सुसंस्कृत आहेत आणि अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणार नाहीत, अशी माझी खात्री आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …