कोल्हापूर – अखेर कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता़भाजप पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार अमल महादेवराव महाडिक यांनी आपल्या समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला़ त्यामुळे आता कोल्हापूर विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होत आहे. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंकत्री सतेज पाटील यांची कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत आता बिनविरोध निवड होणार आहे.
अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमल महाडिक म्हणाले, मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे, म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो. पक्षानेजो आदेश दिला की निवडणूक लढ त्यानुसार निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि त्याच पद्धतीनेशुक्रवारी आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश मान्य करून, भाजपचा आदेश मान्य करून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
भाजपा प्रवक्तेधनंजय महाडिक म्हणाले, दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही निवडणूका होउ शकल्या नाहीत, त्यामुळे येथून पुढील काळात राज्यात जिल्हापरिषद तसेच अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे राज्यामध्ये समन्वय राहावा, सलोखा रहावा. या दृष्टिकोनातून भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यानुसार हा निर्णय झाला. दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी ज्या घडामोडी झाल्या त्याची माहिती दिली. या विभागात आम्ही भाजपा आणि मित्रपक्ष यांच्यावतीनेअमल महाडिक यांचा उमेदवारी अर्जभरलेला होता. शोमिका अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्जभरलेला होता, हे दोन्ही अर्जआम्ही मागेघेतलेले आहेत. या निवडणुकीत आमचेनेते महादेव महाडिक यांना फडणवीस यांनी फोन करून ही सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत विनय कोरेआणि प्रकाशअण्णा आव्हाडे, सुरेश हळवणकर याचसोबत सर्व जिल्हापरिषद सदस्य, सर्व नगरसेवक यांनी आम्हाला साथ दिली. त्या सर्वांचे देखील आम्ही या निमित्त आभार मानतो. अमल महाडिक आणि शोमिका महाडिक यांचे अर्ज मागे घेतलेल आहेत. तसेच, भाजपामध्ये आम्ही सगळी मंडळी आतापर्यंत महाडिक गट म्हणून इथे कार्यरत होतो. आज आम्ही सगळी मंडळी भाजपासोबत आहोत. भाजपामध्ये काम करत आहोत, मी प्रवक्ता आहे आणि सदस्य संख्या या निवडणुकीत आमच्याकडे चांगली झालेली होती. तरी देखील पक्षाचा आदेश म्हणून आपण इथे थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथून पुढे सर्व निवडणुका भाजपाच्या झेंड्याखाली आम्ही लढवणार आहोत, असंही यावेळी धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवले.
दोन जागांच्या बदल्यात कोल्हापूरची जागा
मुंबई भाजपासाठी खूप महत्वाची जागा होती, ती बिनविरोध झाली. त्याविरोधात कोल्हापूर बिनविरोध करावी, अशी मागणी होती. परंतु, धुळे-नंदुरबारची जागा देखील आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजपच्या नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळेधुळे-नंदुरबारमध्येअमरिश पटेल यांची देखील बिनविरोध करायची म्हणजेभाजपाच्या दोन जागांच्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी, हा पक्ष आदेश आज झालेला आहे.