चंदीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ प्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर बुधवारी नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा स्वत: केली. आपला नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व ११७ जागांवर निवडणूक लढेल. वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व ११७ जागा लढवू, मग ते जागा वाटपातून असो किंवा स्वबळावर, असे अमरिंदर सिंग म्हणाले.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करून भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा नवीन पक्ष भाजपासोबत युती करणार नाही पण, भाजपासोबत जागावाटप करेल.
दरम्यान, पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वत:चा पक्ष स्थापन केला, तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ ८५६ मते मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत, अशी टीका सिद्धू यांनी केली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …