अमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा झाल्यास सोडायचंनाही – राज ठाकरे यांचा इशारा


पुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील महत्त्वाची शहरे पिंजून काढत आहेत. नुकताच त्यांनी नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा केला. या दौऱ्यातील मनसे नेतेराज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रात झाल्यास सोडायचे नाही, असा इशाराच राज ठाकरेयांनी दिला आहे. शिवाय नवीन वर्षांपासून धुमधडाका सुरू करू, या राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेराज्यातील महत्त्वाची शहरे पिंजून काढत आहेत. नवीन वर्षापासून धुमधडका सुरू करू. येथून परत घरी जाल त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर आणि घराजवळील चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा पाहिजे. अशा सूचनांसोबतच आमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रातत झाल्यास सोडायचं नाही, असा इशारा राज ठाकरेयांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ खूप मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, आमरावतीसारख्या घटना घडवून महराष्ट्राचं वातावरण अस्थिर केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …