अभिमानास्पद! मास्कच्या वापरात देशात मुंबई अव्वल स्थानी

  • पुणे दहाव्या क्रमांकावर

मुंबई – कोरोनाच नाही तर हवेतील प्रदूषण व इतर आजारांपासून मानवाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे शस्त्र म्हणजेच मास्क. या मास्कमुळे कोरोनासारख्या आजारांचे संसर्ग रोखता येतात. म्हणून वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते राजकीय नेत्यांनी या कोरोना काळात ‘मास्क’ परिधान करण्याचा नेहमीच सल्ला दिला. अशात मुंबईकरांसाठी एक अभिमानास्पद बाब म्हणजे भारतात या मास्कच्या वापरात मुंबई शहर अव्वल स्थानी असल्याचे एका सर्वेक्षणात पाहण्यास मिळाले. मुंबईतील ७६.२८ टक्के लोक हे मास्कचा वापर करतात, तर पुण्यातील ३३.६० टक्के लोक मास्कचा वापर करतात असे डिजिटल इंडिया फाऊंडेशनच्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
डिजिटल इंडिया फाऊंडेशनने देशातील मास्कच्या वापरावर एक सर्वेक्षण केले. देशातल्या ११ शहरांमध्ये २७ दिवस हे सर्वेक्षण झाले. २३ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ९११ जणांच्या मुलाखती झाल्या आणि त्यानंतर ११ शहरांमधल्या मास्क वापरणाऱ्यांची आकडेवारी समोर आली. यामध्ये मुंबईत सर्वात जास्त लोक मास्कचा वापर करत असून, त्याचे प्रमाण हे ७६.२८ टक्के इतके आहे, तर अर्धवट मास्क न घातलेल्या लोकांचे प्रमाण हे १७.५७ टक्के इतके आहे. मुंबईत ६.१५ टक्के लोक मास्कचा वापर करत नाहीत असे या अहवालातून समोर आले आहे. मुंबईत गेल्या दोन वर्षांत जवळपास ८० कोटींचा दंड वसूल करण्यात आला. रुग्ण संख्येत दुसऱ्या स्थानावर असलेली दिल्ली मास्क लावण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर आहे, तर पुणे दहाव्या स्थानावर आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …