अभिमानास्पद! भारताच्या ताफ्यातील ‘ किलर्स स्क्वॉड्रन’ ला ‘राष्ट्रपती मानांकन’

नवी दिल्ली – भारतीय नौदलात शौर्य गाजविणाऱ्या २२ व्या ‘किलर्स स्क्वॉड्रन’ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती मानांकन’ मिळाले. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे एका तुकडीला सर्वोच्च राष्ट्रपती मानांकन मिळाले आहे. १९७१ भारत-पाक युद्धामध्ये भारताला मिळालेल्या विजयाला ५० वर्ष पूर्ण होत आहे. यामध्ये भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांनी महत्त्वाची कामगिरी करत या ताफ्याने पाकिस्तानच्या पाक सागरी हद्दीत जाऊन कंबरडे मोडले होते. त्यानंतर या नौदलाच्या ताफ्याला ‘किलर्स स्क्वॉड्रन’ हे नाव देण्यात आले आणि याच ‘किलर्स स्क्वॉड्रन’च्या शौर्याला सलाम म्हणून हे राष्ट्रपती मानांकन ताफ्याला मिळत आहे. या ताफ्यातील प्रबळ वर्गाच्या दोन युद्धनौका यामध्ये प्रबळ प्रलय युद्धनौका तर वीर वर्गाच्या सहा यामध्ये विनाश, नि:शंक, नाशक, विद्युत, विपुल, विभूती अशा एकूण ८ युद्धनौका ‘किलर्स स्क्वॉड्रन’मध्ये आहेत. १९७१ भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने जी भूमिका बजावली जी कामगिरी केली, त्याचे जगभर कौतुक झाले शिवाय विशेष नोंद घेण्यात आली. पाकिस्तनाच्या सागरी हद्दीत घुसून पाकचे कंबरडे मोडण्याचे काम नौदलाच्या २२ व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या ताफ्यांनी केले. म्हणूनच या भारतीय नौदलातील या ताफ्याला ‘किलर्स स्क्वॉड्रन’ हे बिरुद मिळाले. याच किलर्स स्क्वॉड्रनला राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरवण्यात येणार असून, राष्ट्रपती मानांकन मिळाले आहे. १९७१ च्या भारतीय पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने आपले साहस आणि आपले शौर्य दाखवले त्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …