बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या आगामी चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. त्याचबरोबर ती आपल्या चित्रपटांशी निगडीत अपडेट्सही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कियाराने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगसंदर्भातील आपला अनुभव शेअर केला.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कियाराने सांगितले की, जेवढे मला आठवते त्यानुसार मी एकदा कुणाबरोबर तरी मिटींग करण्यासाठी जात होते. मला आधीच उशीर झाला होता आणि त्याचवेळी फोटोग्राफर्स दाखल झाले होते. त्यामुळे मी हसून तेथून निघून गेले, परंतु त्यानंतर मला या गोष्टीसाठी ट्रोल करण्यात आले की, मी इतकी घमेंडी झाली आहे की, एक फोटोही घेऊ देत नाही. त्यानंतर मी जेव्हा मिटींगच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्याने मला सॅल्युट केले. त्यानंतर मीदेखील काही न बोलता त्याला अभिवादन केले, परंतु फोटोग्राफर्सनी केवळ सुरक्षारक्षकाला सॅल्युट करतानाचा फोटो काढला आणि त्या फोटोवरून मला ट्रोल करण्यात आले. त्यावेळी तिथे असलेल्या एका पुरुष कलाकारासोबतही असेच घडले. परंतु त्याला मात्र कुणीच ट्रोल केले नाही, परंतु अभिनेत्रींना साध्या-साध्या गोष्टींवरूनही ट्रोल केले जाते.’
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कियारा पुढील वर्षी बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. कियारा लवकरच अनीस बज्मी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या भूल भुलैया २ मध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती अभिनेता वरुण धवनसोबत जुग जुग जियो मध्येही दिसून येणार आहे.