ठळक बातम्या

अभिनेता सलमान खानला सर्पदंश; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना

पनवेल – बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानचा सोमवारी २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी सलमान खान हा त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये गेला होता. तेथे शनिवारी रात्री दोनच्या दरम्यान त्याला सर्पदंश झाला. साप चावल्यानंतर त्याला तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलमान खानला चावलेला साप हा बिनविषारी होता. त्यामुळे सलमानच्या प्रकृतीवर त्याचा फारसा विपरित परिणाम झालेला नाही.
सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस अथवा इतर घरगुती कार्यक्रम पनवेल येथील अर्पिता फार्म हाऊसवर साजरा करीत असतो. यावेळेला देखील ख्रिसमस, नववर्षाच्या सेलिब्रेशनासाठी सलमान पनवेलमध्ये दाखल झाला. याचदरम्यान, शनिवारी याच फार्म हाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला. त्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास सलमान खानला एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी दाखल करण्यात आले होते. यावेळी सलमानला प्राथमिक उपचार देण्यात आले. यावेळी एमजीएमचे डॉक्टर सलमानवर लक्ष ठेवून होते. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास सलमान खानला सोडण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुधीर कदम यांनी दिली. सलमान एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथक यांच्यासोबत त्याच्या पनवेलमधील अर्पिता फार्म हाऊस याठिकाणी थांबले आहे. यावेळी एक सर्व सोयी-सुविधायुक्त ॲम्ब्युलन्सदेखील एमजीएम रुग्णालयाच्या वतीने फार्म हाऊसवर ठेवण्यात आली असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …