अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण

  • ट्विट करत दिली माहिती

मुंबई – मराठीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी याला कोरोनाची लागण झाली आहे. अंकुशने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. अभिनेता अंकुश चौधरीने ट्विटरवर ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. अंकुशने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशीर्वाद आहेच. कोरोनावर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी. अंकुशने नुकतेच मराठी डान्सिंग रिॲलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. यानंतर आता लवकरच त्याचा ‘लकडाऊन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील दिसणार आहे. ‘लकडाऊन’ चित्रपटाची कथा त्याच्या नावातच दडलेली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …