ठळक बातम्या

अफगाणिस्तानचा नामिबियावर ६२ धावांनी विजय

अबुधाबी – अफगाणिस्तानने शानदार गोलंदाजीच्या जोरावर रविवारी येथे आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ सत्रातील ग्रुप दोन सामन्यात नामिबियाचा ६२ धावांनी पराभव करत माजी कर्णधार असघर अफघानला विजयी समारोप दिला. अफगाणिस्तानचा हा दुसरा विजय ठरला. अशाप्रकारे अफगाणिस्तान ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

स्पर्धेत पदार्पण करणारा नामिबियाने देखील मागील सामन्यात स्कॉटलंडवर विजय मिळवला होता. अफगाणिस्तानने चांगल्या सुरुवातीनंतर मोहम्मद शहजादच्या ४५ धावांच्या मदतीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६० धावांचे आव्हान उभे केले होते. शहजादशिवाय संघासाठी हजरतुल्लाह झझईने ३३, कर्णधार मोहम्मद नबाने नाबाद ३२ व अफघानने ३१ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानने आपल्या शानदार गोलंदाजी आक्रमणाने नामिबियाचा निर्धारित २० षटकांत ९ बाद ९८ धावा केल्या. नामिबिया कोणतीच मोठी भागीदारी रचू शकले नाही व त्यांच्यासाठी सर्वात जास्त २६ धावा डेव्हिड विसेने केले. अफगाणिस्तानसाठी हामिद हसनने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत ९ धावा देत ३ विकेट मिळवले, तर नवीन उल हकने २६ धावांत ३ विकेट मिळवले. स्टार लेग स्पिनर राशिद खानने १४ धावा देत एक विकेट मिळवला. गुलबदिन नईबने ४ षटकांत एक मेडन षटक टाकले व १९ धावा देत २ खेळाडूंना माघारी धाडले. अफगाणिस्तानने झझई (३३ धावा) व शहदाजच्या पॉवर प्लेमध्ये विकेट घेतल्याशिवाय ५० धावा करत चांगली सुरुवात केली. या भागीदारीमध्ये झझई खूप आक्रमक होता. पण तो जेजे स्मिटच्या पुढील षटकात शिकार झाला. शहजादने त्यानंतर डाव सावरला. त्याने ३३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार ठोकत ४५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला रहमनुल्लाह गुरबाज जास्त मैदानात तग धरू शकला नाही आणि इटॉनच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. नजीबुल्लाह झरदानही झटपट बाद झाला. ११ चेंडंूत ७ धावा करून इटॉनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तर अफघान ३१ धावा करून ट्रम्पलमॅनच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १६१ धावांचा पाठलाग करताना नामिबियाचा फलंदाजांची घसरगुंडी झाली. एकापाठोपाठ एक करत फलंदाज तंबूत परतले. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर क्रेग विलियम्स अवघी १ धाव करून बाद झाला. त्यानंतर मायकल लिंगेन (११), निकोल इटॉन (१४), गेरहार्ड इरास्मुस (१२), झेन ग्रीन (१), डेविड विस (२६), जेजे स्मिथ (०), जॅन फ्रायलिंक (६) आणि पिक्की या फ्रान्स (३) धावा करून तंबूत परतले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

6 comments

  1. Pingback: 뉴토끼

  2. Pingback: wongkito4d

  3. Pingback: 늑대닷컴

  4. Pingback: Morphine Sulfate online shop

  5. Pingback: bonanza178

  6. Pingback: Fun Cup 2024