अपेक्षा करतो की, भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा होईल – फरहान बेहार्डियन

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू फरहान बेहार्डियेन यांना अपेक्षा आहे की, नव्या कोरोना व्हायरस वेरिएंटमुळे भारतीय संघाचा पुढील महिन्यातील दौरा रद्द होणार नाही, कारण आमच्या देशातील युवा क्रिकेटपटूंना या मालिकेची नितांत गरज आहे. भारतीय संघाला जोहान्सबर्ग, सेंच्यूरियन, पार्ल व केपटाऊनमध्ये तीन कसोटी, तीन वनडे व चार टी-२० सामने खेळायचे आहेत. नव्या कोरोना वेरिएंटमुळे हा दौरा लांबणीवर पडू शकतो. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, मालिकेवरील कोणताही निर्णय सरकारच्या सल्ल्याच्या आधारे घेतला जाईल. बेहार्डियेन यांनी ट्विट केले की, अपेक्षा आहे की, जगातील सर्वात मोठा क्रिकेट खेळणारा देश पुढील महिन्यात आपल्या देशाचा दौरा करेल. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या पुढील पिढीसाठी हे नितांत गरजेचे आहे. असे कळते की, बीसीसीआय पुढील काही दिवसांत याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेसोबत चर्चा करणार आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट बी.१.१. ५२९ जगभरात दहशत निर्माण करत आहे. जागतिक आरोग्य संस्थेने याला ओमिक्रोन नाव दिले आहे. नव्या वेरिएंटचा प्रभाव खेळावर पडताना दिसत आहे. नेदरलँडने सेंच्यूरियनमधील वनडे मालिका मध्येच सोडली. तसेच येथे होणाऱ्या एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषक ही स्थगित करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते १६ डिसेंबर या काळात होणार होती.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …