…अन् प्रसाद लाड यांचा झोपेतच मोडला अंगठा!

मुंबई – भाजप व सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात नेहमीच खटके उडत असतात. अशात मागील काही काळापासून शिवसेना व भाजप यांच्यातील दरी ही वाढतच चालली असून, अनेक वेळा दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते आमने-सामने आलेत. सहसा नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच एकमेकांना जास्त भिडतानाचे चित्र असते. दरम्यान, या सर्व घडामोडींत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. ही दुखापत कुठल्या झटापटीत झाली?, लाड यांच्यासोबत नेमके काय घडले? हे आपण जाणून घेतले, तर तुम्हाला नकळतपणे हसू आल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद लाड यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाले असे की, प्रसाद लाड हे रात्री झोपेत होते. त्यावेळी त्यांना एक स्वप्न पडले. या स्वप्नात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी दोन हात करत असल्याचे त्यांना वाटले. मग काय? झोपेत असतानाच त्यांनी हातापायीला सुरुवात केली. यात त्यांचा हात बेडच्या मागे असलेल्या भिंतीवर जोरात आदळला गेला आणि त्यांच्या अंंगठ्याचे हाड डिसलोकेट झाले. त्यामुळे लाड यांना आता हाताला बँडेज करावे लागले आहे. हाताला दुखापत झालेले लाड यांचे दोन फोटोही समोर आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …