अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत ७१व्या स्थानावर

 

११३ देशांचा यादीत समावेश
नवी दिल्ली – एका अहवालानुसार, ११३ देशांच्या ग्लोबल फुड सिक्युरिटी (जीएफएस) निर्देशांक २०२१मध्ये भारत ७१व्या क्रमांकावर आहे. एकूण गुणांच्या बाबतीत भारताने दक्षिण आशियात सर्वोत्तम स्थान मिळवले आहे; पण अन्न सुरक्षेच्या बाबतीत शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यापेक्षा मागे आहे. अन्न सुरक्षेच्या श्रेणीमध्ये पाकिस्तानने (५२.६ गुणांसह) भारतापेक्षा (५०.२ गुण) चांगले गुण मिळवले आहेत.

इकॉनॉमिस्ट इम्पॅक्ट आणि कॉर्टेवा अ‍ॅग्रीसायन्सने मंगळवारी जारी केलेल्या जागतिक अहवालात म्हटले आहे की, जीएफएस इंडेक्स-२०२१च्या या श्रेणीमध्ये ६२.९ गुणांसह श्रीलंकेने आणखी चांगली कामगिरी केली आहे. आयर्लंड, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, फिनलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि अमेरिका यांनी ७७.८ ते ८० गुणांच्या एकूण जीएफएस निर्देशांकात अव्वल स्थान सामायिक मिळवले आहे.
जीएफएस निर्देशांक २०३०पर्यंत शून्य उपासमारीच्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने प्रगतीला गती देण्यासाठी आवश्यक प्रणालीगत दोषांकडे लक्ष वेधतो. जीएफएस इंडेक्स ११३ देशांमध्ये अन्न सुरक्षेच्या मूलभूत घटकांचे मोजमाप करते, जे परवडण्या योग्यता, उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधने आणि लवचिकता यांसारख्या घटकांवर आधारित आहे.

अहवालानुसार, एकूण ५७.२ गुणांसह ११३ देशांच्या जीएफएस निर्देशांक २०२१ मध्ये भारत ७१व्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तान (७५व्या), श्रीलंका (७७व्या), नेपाळ (७९व्या) आणि बांगलादेश (८४व्या) स्थानावर आहे. भारत चीनपेक्षाही (३४व्या स्थानी) खूप मागे आहे.
अहवालात म्हटले आहे की, अन्न उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अन्न उत्पादनासाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भारताने जीएफएस निर्देशांक २०२१ मध्ये पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापेक्षा चांगले गुण मिळवले. तर, गेल्या १० वर्षांमध्ये संयुक्त अन्न सुरक्षा स्कोअरमध्ये भारताचा वाढता नफा पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशच्या मागे होता.

दरम्यान, याआधीही जागतिक भूक निर्देशांक (ॅ’ङ्मुं’ ँ४ल्लॅी१ ्रल्लीि७) ??????????????२०२१ मध्ये भारत ११६ देशांपैकी १०१व्या स्थानावर आहे. यामध्ये भारत हा पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. २०२०मध्ये भारत या यादीत ९४व्या क्रमांकावर होता. एका वर्षात भारत सात स्थानांनी घसरला आहे. आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भूकेची पातळी चिंताजनक असल्याचा उल्लेख केला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *