ठळक बातम्या

अन्नाऐवजी ही बाई खाते भिंत

आपल्या येथे एक म्हण आहे की, काही लोक घराचे वासे अन् घर खातात; पण ते शब्दश: खरे नसते. अमेरिकेत मात्र एक अशीच महिला नुकतीच समोर आली आहे, जी तिच्या घराच्या भिंतीच उकरून खाऊन टाकते. अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाºया एका महिलेने टीव्हीवर तिच्या विचित्र व्यसनाचा खुलासा केला आहे. निकोल नावाच्या या महिलेने टीएलसीच्या माध्यमातून लोकांना सांगितले की, तिला भिंत खायला आवडते. तिने अनेक ठिकाणांहून घराची भिंत तोडून खाल्ली आहे. तिचे हे विचित्र व्यसन जाणून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
कोणत्याही गोष्टीचे व्यसन वाईट आहे. निरोगी राहण्यासाठी व्यसन नाही तरी चालेल? पण कधी कधी लोकांना विचित्र गोष्टी आवडण्याची सवय असते. याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेतील मिशिगन येथे राहणारी निकोल. निकोलला खडू खाण्याची सवय आहे. ही सवय नंतर व्यसनात रूपांतरित झाली, त्यामुळे ती घराची भिंत खाऊ लागली. आज अशी अवस्था झाली आहे की, निकोल दिवसातून ६ वेळा तिच्या घराच्या भिंतींचा चुना खरवडून खाते. तिची ही सवय जाणून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

निकोलने उघड केले की, तिला वाळलेल्या भिंतींचा वास आवडतो. यासोबतच तिला त्याचा पोत आणि टेस्टही खूप आवडते. निकोलला या गोष्टी इतक्या आवडतात की, एका आठवड्यात ३.२ चौरस फूट भिंत खाते. एका मुलाची आई असलेल्या निकोलने सांगितले की, जेव्हाही तिला वाटेल, तेव्हा ती भिंत तोडून खायला लागते. मग ती तुमच्या घराची भिंत असो किंवा मित्राचे घर. ती तिच्या नातेवाईकांच्या घराची भिंतही खात असते.
निकोलने पुढे सांगितले की, तिची खडू खाण्याची सवय आजपासून ५ वर्षांपूर्वी व्यसनात बदलली होती, तेव्हा तिची आई वारली होती. आई गेल्याने निकोल कधी भिंत खाऊ लागली हे कोणालाच कळले नाही. यामुळे तिला खूप लाज वाटते, कारण तिला माहीत आहे की, भिंत ही काही खाण्यासारखी नाही. असे असतानाही तिच्या व्यसनाधीनतेपुढे ती हताश झाली आहे. निकोल पुढे म्हणाली की, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या भिंती टेस्ट करायला आवडतात. काही जाड भिंती आहेत, काही खूप पातळ पेंट लेपवाल्या आहेत. या सर्वांची टेस्ट वेगवेगळी आहे.

असे असले, तरी खाण्याकरिता तिला दानेदार भिंत अधिक आवडते. त्यात क्रंच आहे; मात्र ही सवय उघड झाल्यानंतर डॉक्टरांनी निकोलला इशारा दिला आहे. वॉल पेंटमध्ये असलेल्या रसायनांमुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. यामुळे तिच्या आतड्यांत मोठी समस्या निर्माण होऊ शकते; पण निकोल स्वत:ला असहाय्य समजते. या व्यसनातून मुक्त होण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले; मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. त्यांच्या घराच्या भिंती अनेक ठिकाणी पोकळ झाल्या आहेत. त्याचबरोबर निकोलने आपली ही सवय सोडली नाही, तर ती तिच्यासाठी जीवघेणी ठरेल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …