‘अन्नत्याग’ चिघळला : संघटनेचा ‘रास्तारोको’

* आंदोलनस्थळी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड

* रविकांत तुपकरांची प्रकृती ढासळली

* कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न :
बुलडाणा – कापूस, सोयाबीन उत्पादकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जिवाचे रान करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आता आक्रमक वळणावर आले आहे. नागपूरमध्ये पोलिसांनी आंदोलन चिरडल्यानंतर तुपकरांनी आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग सुरू केला असून, त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. तरीही निर्ढावलेले शासन दुर्लक्ष करत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलनस्थळी शेख रफिक या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. त्याचवेळी चिखली महामार्गावर कार्यकर्ते आडवे झाले आणि वाहतूक बंद करण्यात आली. काही मिनिटांची अवधी जात नाही तोच पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याने या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तत्पूर्वी जिल्हाभरात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …