ठळक बातम्या

अनोखे गाव जिथे सगळेच आहेत शुद्ध शाकाहारी


(अरांऊंड द वर्ल्ड) अनोखे गाव जिथे सगळेच आहेत शुद्ध शाकाहारीजगात असे अनेक शाकाहारी लोक आहेत, जे मांस खात नाहीत, तसेच प्राण्यांच्या माध्यमातून मिळणारे पदार्थ वापरत नाहीत. अशा लोकांना आणि त्यांच्या आहाराला व्हेगन डाएट म्हणतात. आजच्या काळात व्हेगन ही एक मोहीम बनली आहे, ज्याद्वारे लोक इतरांनादेखील प्राणी उत्पादने सोडून देण्यासाठी जागरूक करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाविषयी सांगणार आहोत, जिथे राहणारा प्रत्येक व्यक्ती शुद्ध शाकाहारी आहे.इस्रायलमधील नेवे शालोममध्ये डिमोना नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात जेरुसलेममध्ये ३००० आफ्रिकन हिब्रू इस्रायली राहतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावातील लोक गेल्या ५० वर्षांपासून शुद्ध शाकाहारी आहेत. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्ती शाकाहारी आहे. येथे चिकन, मटण, मासे इत्यादी मांस खाल्ले जात नाही, तसेच दूधही प्यायले जात नाही. मांस आणि दुधाव्यतिरिक्त, डिमोना गावातील लोक आठवड्यातून ३ दिवस मीठ खात नाहीत आणि वर्षातून ४ आठवडे साखर खात नाहीत. त्यांचे जेवण इतके साधे आहे की, ते त्यात जास्त मसाले किंवा इतर काहीही घालत नाहीत. लोकांचे म्हणणे आहे की, या गावात कोणीही अन्नाची चाचणी घेण्यासाठी जात नाही, कारण येथील अन्न इतर लोकांना चविष्ट वाटणार नाही. हिब्रू इस्रायली लोकांचा असा विश्वास आहे की, अ‍ॅडम आणि इव्हदेखील शाकाहारी होते, म्हणून हे लोक मांस खात नाहीत. येथील लोक शरीराला मंदिरासारखे पवित्र मानतात आणि ते मांस किंवा मसाल्यांनी विटाळू इच्छित नाहीत.डिमोना गावातील लोकांशी संबंधित आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथील लोक आपल्या शरीराची प्रत्येक प्रकारे काळजी घेतात. नास डेलीच्या व्हिडीओनुसार, मांसाशिवाय येथील लोक दारू आणि सिगारेटही पीत नाहीत. एवढेच नाही तर लोक आठवड्यातून तीनदा व्यायाम करतात. यासोबतच ते दर महिन्याला बॉडी मसाजही करून घेतात. शरीराची एवढी काळजी घेतल्याने इथल्या लोकांकडे पाहून त्यांच्या खºया वयाचा अंदाज लावणेही अवघड आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments

  1. Pingback: ผลบอล

  2. Pingback: Jacksonville SEO