बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांची मने जिंकून घेत आली आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते पसंती दर्शवताना दिसून येतात. चाहत्यांबरोबर अनुष्काचा पती विराट कोहलीही अनुष्काच्या प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया देत असतो. नुकतेच अनुष्काने आपले काही अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत, जे पाहून विराट पुन्हा एकदा आपल्या पत्नीच्या प्रेमात घायाळ झाला आहे.
अनुष्काने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपले अतिशय सुंदर असे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अनुष्का काळ्या रंगाच्या टॉपमध्ये उन्हात उभी असलेली दिसून येतेय. या फोटोत अनुष्का खूपच क्युट दिसत आहे. अनुष्काचा हा सन किस्ड फोटो तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनुष्काने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सूर्य चमकत आहे, वातावरण खूप छान आहे, त्याने मला पोस्ट देण्याकरिता व यांना पोस्ट करण्यासाठी भाग पाडले आहे.’ अनुष्काचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून, या फोटोवर सोशल मीडिया युझर्स भरभरून कमेंट करताना दिसत आहेत. अनुष्काच्या या पोस्टवर विराट कोहलीने हार्टशेप इमोजी बनवली आहे.