फिल्ममेकर अनुराग कश्यपने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अनुरागच्या आगामी चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन ही लीड रोलमध्ये दिसून येणार आहे. सध्याच्या घडीला अनुराग तापसीसोबत दोबारा चित्रपटावर काम करत आहे. अनुरागचा दोबारा हा चित्रपट एका स्पॅनिश फिल्मचे हिंदी ॲडप्टेशन आहे.
अनुरागने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे त्यात तो लिहिताना दिसून येतोयं. या फोटोबरोबरच त्याने इंस्टाग्रामवर लिहिले आहे,’आणखी एक स्क्रप्टि…आणखी एक चित्रपट…निखिल द्विवेदी आणि क्रिती सेनन, लवकरच सुरू होत आहे.’ दरम्यान, निखिल द्विवेदीनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात क्रिती सेनन लीड रोल साकारणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. क्रितीबद्दल बोलायचे झाले तर ती मागच्या वेळेस ‘मिमी’ या चित्रपटात लीड रोलमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर क्रिती आता लवकरच अक्षय कुमार बरोबर बच्चन पांडे, प्रभाससोबतचा आदिपुरुष, वरुण धवन बरोबर भेडिया, टायगर श्रॉफ बरोबरचा गणपत आणि कार्तिक आर्यनसोबतच्या शहजादा या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: 뉴토끼