अनिल परब शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत – रामदास कदम

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही,
गद्दार कोण हे शिवसैनिकांना कळले पाहिजे

मला संपवण्यासाठी परबांचे प्रयत्न
लवकरच पुढची भूमिका स्पष्ट करणार

मुंबई – माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट-सुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजºयामध्ये उभे केले आहे आणि ते किती चुकीचे आहे हे स्पष्ट दिसत असल्यानंतर माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही. त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाला हानी पोहचेल अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडलेली नाही. मी उद्धव ठाकरेंना पत्र देऊन खुलासा केला होता. दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती. या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळे नमूद केले आहे, असे रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती हल्ला केला. अनिल परब हे शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.
शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना काही पुरावे दिल्याच्या आरोपानंतर रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याबाबतची एक आॅडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले जात होते. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते. ही क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचे तरी हे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

रामदास कदमला राजकारणातून संपवण्याचा डाव शिवसेने मधल्या काही नेत्यांचा आहे. अनिल परब यांनी वांद्रे येथून निवडून येऊन दाखवावे. तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की, एखाद्या शिवसेना नेत्याला आणि त्याच्या मुलाला संपूर्ण राजकारणातून कायमचे संपवायचे. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब राष्ट्रवादीच्या नेत्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर योगेश कदमबाबत सुडाची भावना बाळगली. दोन वर्षांमध्ये अनिल परब यांनी माझ्या मुलाचा एकही फोन उचलला नाही. अनिल परबांनी तिथे मनसेच्या वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठीशी घालण्याचे काम केले, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनिल परबांनी सर्व पदाधिकाºयांना एकत्र करून दोन उमेदवार निश्चित केले आहेत. त्याबाबत पक्षाला कळवल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवडणुकीसाठी अनिल परब यांनी त्यांच्या मुंबईच्या आॅफिसमध्ये बैठक बोलवली होती. त्याला सुनील तटकरे आणि शिवसेना विरोधात काम करणारे सूर्यकांत दळवी यांना बोलावले होते. पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवणारे उदय सामंत यांनाही त्यांनी बोलवले होते. त्यानंतर तिकिटी वाटप करून राष्ट्रवादीला पहिले अडीच वर्षांचे नगराध्यक्ष पद दिले. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार? शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशात टाकणारे अनिल परब निष्ठावान कसे असू शकतात, असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे.

रत्नागिरी जिल्हा त्यांनी वाºयावर सोडून दिला

अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी संपूर्ण जिल्हा त्यांनी वाºयावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. अनिल परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे मी पक्षाविरोधात बोलणे असे सांगितले जाते. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत असल्याने पाडण्यात आला. यांनी स्वत:चे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की, मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचे उद्ध्वस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खासगी मालमत्तेचा शिवसेनेसोबत काय संबंध?, माझ्या विरोधात दसरा मेळाव्यामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या. त्याचा मी निषेध करतो. मी आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळे माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्यापाठीमागे कोण आहे, मला सगळे माहीत आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …