अनिल देशमुख यांना ED कडून अटक
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची 13 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
PMLA कायद्याच्या सेक्शन 19 अंतर्गत त्यांच्यावर अटकेची तारवाई करण्यात आली आहे. त्यांना आज ( मंगळवार) मुंबईच्या सेशन्स कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोर्टाला दिवाळीची सुट्टी असल्याने हॅालिडे कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. या प्रकरणी अनिल देशमुख याचे दोन स्वीय सहाय्यक संजय पालांडे आणि कुंदन शिंदे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.
अनिल देशमुख या कटाचे प्रमुख सूत्रधार.
पालांडे यांनी जबाबात सांगितलंय की IPS अधिकाऱ्यांच्या बदली मागे अनिल देशमुख यांचा हात होता.
सगळा व्यवहार रोखीने व्हायचा.
संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मध्यस्थ आहेत.
पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जात होते.
चौकशीत अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा थेट सहभाग असलेल्या 11 आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या 13 कंपन्यांची भूमिका.
चौकशीत उघड झालंय की अनिल देशमुख यांच्या अप्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यातून त्यांच्या प्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यात पैशांचा व्यवहार होत होता.
हा मनी लॅांडरिंगचा प्रकार आहे,
सचिन वाझे यांच्या जबाबानुसार त्यांना अनिल देसमुख यांच्याकडून काही प्रकरणात थेट आदेश मिळत होते.
वाझे जबाबात सांगतात त्यांनी अनिल देशमुख यांच्या आदेशावरून 4.70 कोटी रूपये कुंदन शिंदे यांना दिले.
अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत 4.18 कोटी रूपये ट्रान्सफर झालेत. पैसे देणाऱ्या दिल्लीच्या कंपन्या फक्त पेपरवर आहेत.
हवालाच्या माध्यमातून पैसे दिल्लीहून नागपूरला आणण्यात आले.
अनिल देशमुख यांना बार मालकांकडून 4.70 कोटी रूपये लाच म्हणून मिळाले.
मुलगा ऋषीकेष देशमुख याच्या माध्यमातून दिल्लीच्या कंपन्यांना पैसे देऊन हा पैसा साई शिक्षण संस्थेत फिरवण्यात आला.
घटनाक्रम
21 मार्च – रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं.
5 एप्रिल – अनिल देशमुख यांचा राजीनामा.
10 मे – ईडीने मनी लॅाडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला.
26 जून – अनिल देशमुख यांना पहिलं समन्स.
29 जून – दुसरं समन्स.
5 जुलै – तिसरं समन्स पाठवण्यात आलं.
16 जुलै – चौकशीसाठी चौथं समन्स देण्यात आलं.
17 ऑगस्ट – अनिल देशमुख यांना पाचवं समन्स.
2 सप्टेंबर- देशमुख यांनी बॅाम्बे हायकोर्टात समन्स रद्द करण्याची याचिका केली.
29 ऑक्टोबर – अनिल देशमुख यांची समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.
1 नोव्हेंबर – अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर.
2 नोव्हेंबर – अनिल देशमुख यांना अटक.
One comment
Pingback: พาร์ทเนอร์ของ MannaPlay