अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाºया चांदिवाल आयोगाने आता अनिल देशमुख यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. सचिन वाझेच्या बद्दल क्रॉस एक्झामिनेशनसाठी वकिलाच्या अनुपस्थितीमुळे हा दंड ठोठवला गेला आहे. हा दंड मुख्यमंत्री मदत निधीत जमा केला जाणार आहे.
याअगोदर सप्टेंबर महिन्यात वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. परमबीर सिंग हे आयोगासमोर उपस्थित राहत नाही. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे, असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर आयोगाने परमबीर सिंग यांना ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये या आयोगाची स्थापना केलेली आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …