अनिल देशमुखांप्रमाणेच मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू – नवाब मलिक

अमित शहांकडे तक्रार करणार

मुंबई – राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. आता मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिली आहे. या लोकांचे ट्विटर हँडल पाहिले असता ते भाजपशी संबंधित असल्याचे दिसत आहे, असे नवाब मलिक म्हणाले. अनिल देशमुख यांच्याबरोबर जसा खेळ झाला तसेच सुरू झाले आहे. याबाबत माझ्याकडे माहिती आली आहे. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवले जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाºयांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट आहेत. याबाबत मी अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे. काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची, कार्यालयाची आणि माझे लहान नातू कोणत्या शाळेत जातात याची माहिती काढत असल्याचे मला कळाले. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन जण कॅमेरा घेऊन माझ्या घराचे फोटो काढत होते. तेव्हा घराच्या परिसरातील लोकांनीच त्यांना अडवले. त्यानंतर ते पळू लागले. त्यांना टिळक टर्मिनस येथे पकडण्यात आले.
मी ट्विटरवर या लोकांचे फोटो टाकले त्यानंतर या २ पैकी एकाची माहिती समोर आली आहे. ही एक व्यक्ती मागील २ महिन्यांपासून राज्यात जे सुरू होते त्यावरून माझ्याविरोधात ट्विट करत होता. त्याचे नावही समोर आलेय. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. मी जेव्हा कुठे कागदपत्रे काढायला जातो किंवा कोणत्याही विभागात तक्रार करायला जातो तेथे ठिकठिकाणी यातील एक व्यक्ती दिसून आला आहे, असेही मलिकांनी नमूद केले आहे. फोटो दाखवत, या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावे, मी सर्व माहिती देतो असेच माझे त्यांना सांगणे आहे, असेही ते म्हणाले.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …