ठळक बातम्या

अनिल देशमुखांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचेय – प्रफुल्ल पटेल

नागपूर – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. नागपुरामधील लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. हे आपलं मत नसून, शरद पवार यांचे मत असल्याचे स्पष्टीकरणही प्रफुल्ल पटेलांनी दिले आहे.
प्रफुल्ल पटेल यावेळी बोलताना म्हणाले की, हे अनिल भाऊ लवकरच आपल्या सोबत येतील. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे. पवार साहेबांचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहे आणि आपल्याला लवकरात लवकर अनिल बापूला परत या त्यांच्या जागेवर बसवायचं आहे. हे पवार साहेबांचे विचार आहेत. माझ्या एकट्याचे नाहीत, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणतीही पोकळी निर्माण झाली आहे, असे कोणाला वाटू नये, असेही पटेल म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …