अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत – प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

नागपूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सध्या १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. अनिल देशमुख एका प्रकरणात फसल्याचे दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावे. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असे आंबेडकर म्हणाले.

कलेक्शन झाले, पण तो पैसा अनिल देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे त्यांनी सांगावे. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजीर मात्र पुढे येत नाहीत, असा दावा करतानाच राज्यपालांनी याचा विचार करावा, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचे माहिती होते. तेव्हा कारवाई का केली नाही?, आपल्यावर शेकल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढले. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. न्यायालयाने राजकीय गुन्हेगारी केसेसचा निकाल लावावा, असेही आंबेडकर म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …