अनन्या पांडेची एनसीबीकडून २ तास चौकशी

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे. आर्यनच्या चौकशीदरम्यान त्याच्याकडील मोबाईलमध्ये आढळलेल्या चॅटमध्ये अन्नन्या पांडे हिचे नाव समोर आले होते. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अन्नन्याला एनसीबीने गुरुवारी दुपारी २ वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र ती दीड तास उशिरा एनसीबी कार्यालयात तिचे वडील अभिनेता चंकी पांडे सह पोहोचली.
आर्यनच्या मोबाईल चॅटमध्ये ड्रग्जबाबत चर्चा करतानाचे पुरावे एनसीबीला मिळाल्याने अन्नन्या एनसीबीच्या रडारवर आली आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिच्या वांद्रे येथील घरावर एनसीबीने छापा मारला आहे. अनन्या हिच्या पाली हिल येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवली गेली. यावेळी अभिनेत्री अनन्या हिच्या घरावरील छाप्यात एनसीबीने फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केली आहेत. ड्रग्जप्रकरणात एनसीबीने समन्स बजावल्यानंतर पिता चंकी पांडेसह अनन्या पांडेही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाले होते. सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली.
आर्यन खानच्या चौकशीची जबाबदारीही वानखेडेंकडेच होती. अनन्यासोबत तिचे वडील अभिनेता चंकी पांडेदेखील कार्यालयात पोहोचले आहेत. या चौकशीदरम्यान आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं पांडे परिवाराने सांगितले आहे. गरजेची सर्व माहिती आपण एनसीबीला पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितले.
अनन्या पांडे आणि आर्यन खान यांची मैत्री आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यांच्यात झालेल्या बोलण्यावरुन एनसीबीने हा छापा मारल्याचे सांगितले जात आहे. अनन्यासह तिचे वडील चंकी पांडे यांना चौकशीसाठी बोलावले गेले. त्यानुसार अनन्या पांडेसह तिचे वडिल चंकी पांडे हे दुपारी ४ वाजता एनसीबीसमोर हजर झाले होते. यावेळी त्यांची सुमारे २ तास चौकशी झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *