शारजा – अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक म्हणाला की, स्कॉटलंडवर १३० धावांच्या मोठ्या विजयाने आमचा संघ समाधानी होणार नाही, कारण टी-२० विश्वचषकात त्यांना पुढे भारत व न्यूझीलंडसारख्या संघांकडून कठोर आव्हानांचा सामना करायचा आहे. मुजीब उर रहमान (२० धावांत पाच) व राशिद खान (नऊ धावांत चार) यांच्या घातक गोलंदाजी माऱ्याच्या जोरावर अफगाणिस्तानने स्कॉटलंडला ६० धावांत गारद करत १३० धावांनी मोठा विजय मिळवला. हकलाही एक विकेट मिळाला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चार बाद १९० धावा केल्या. हक संघाच्या विजयानंतर म्हणाला, आम्हाला संघाच्या चांगल्या सुरुवातीसाठी अशाप्रकारच्या विजयाची गरज होती, पण आम्ही या विजयाने समाधानी होणार नाही. आम्हाला आता पुढील सामन्याबाबत विचार करावा लागेल. आम्ही या विजयाचा आनंद घेऊ, हा एक शानदार सामना होता; पण स्पर्धेत अद्याप चार सामने शिल्लक आहेत. तो म्हणाला, अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी स्पर्धेसाठी चांगली तयारी केली व हे त्यांच्या प्रयत्नात ही दिसले. हक म्हणाला की, आमचे खेळाडू त्यासाठी तयार होते. आम्ही योग्यरित्या तयार होतो. आमचे अनेक खेळाडू विविध लीगमध्ये खेळत होते, त्यामुळे सर्व खेळाडू या सामन्यासाठी तयार होते. अफगाणिस्तानचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …