ठळक बातम्या

अण्णांची प्रकृती ठणठणीत : रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल

पारनेर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून, काळजीचे कोणतेही कारण नसल्याची अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अण्णा बुधवारी दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरूप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सूचना केली. त्यानुसार अण्णांना गुरुवारी विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे. झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला, तरी वयानुरूप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून, तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. विश्रांतीसाठी गुरुवारी रात्री अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरित तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नसल्याचे अण्णा हजारे यांचे कार्यालय भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी येथील प्रतिनिधी संजय पठाडे यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …