अज्ञात तरुणाची मुंबई विमानतळ परिसरात घुसखोरी

मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयास्पद तरुणाने जबरदस्तीने विमानतळ परिसरात घुसखोरी केली होती. त्यानंतर तो धावपट्टीच्या दिशेने धावत चालला होता; पण सीआईएसएफच्या जवानांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मुंबई सहार पोलिसांना देण्यात आली असून, आयबीकडूनही संशयिताची चौकशी केली जात आहे.

विमानतळावरील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरुणाने विमानतळाच्या पाठीमागील बाजूस असणाºया जरी-मरी परिसरातून विमानतळ परिसरात घुसखोरी केली होती. यावेळी गस्तीवर असणाºया सीआईएसएफच्या जवानांनी हा प्रकार पाहिला. आरोपी तरुणाने आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो थेट धावपट्टीच्या दिशेने धावू लागला. यावेळी सीआईएसएफच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत अत्यंत शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सीआईएसएफच्या जवानांनी तातडीने या घटनेची माहिती मुंबई सहार पोलिसांना दिली. या धक्कादायक प्रकारानंतर आयबीसह अन्य तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई सहार पोलीस आणि आयबीकडून संयुक्तपणे तरुणाची चौकशी केली जात आहे. पोलिसांना संशयिताकडे कसलेही शस्त्र अथवा अन्य वस्तू आढळल्या नाहीत. त्याची लवकरच वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकाºयांकडून सांगण्यात आली आहे.

संबंधित तरुण नेमका कोण आहे?, त्याने विमानतळ परिसरात अशाप्रकारे घुसखोरी का केली?, त्याचा इरादा काय होता?, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. मुंबई शहर पोलीस आणि आयबीकडून संयुक्तपणे आरोपीची चौकशी केली जात आहे. संशयिताने अशाप्रकारे घुसखोरी केल्याने विमानतळ परिसरात खळबळ उडाली होती.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …